भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां ऐसे करीगा देवा। तुझी घडो पाय सेवा

atan aise kariga deva| tujhi ghado pay seva

रचनाकार: संत सेना · अभंग
आतां ऐसे करीगा देवा। तुझी घडो पाय सेवा ॥१॥ मनामाजी दुर्बुद्धी। न यावी माउलिये कधीं॥२॥ चित्तीं भाव जो धरिला। सिद्धी न्यावाजी विठ्ठला ॥३॥ सेना म्हणे याविण कांहीं। लाभ दुसरा नाहीं ॥४॥