भजनी मालिका
← भजनांकडे परत

असाल तेथें नामाचे चिंतन। याहूनि साधन आणिक नाहीं

asal tethen namache chintan| yahuni sadhan anik nahin

रचनाकार: संत सेना · अभंग
असाल तेथें नामाचे चिंतन। याहूनि साधन आणिक नाहीं ॥१॥ सोडवील माझा भक्ताचा कैवारी। प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥२॥ गुण दोष याती न विचारी कांहीं। धांवे लवलाही भक्तकाजा ॥३॥ अवघे काळीं वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जाऊं नद्या॥४॥