भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां एकविध भाविकांची जाती । न जाणे निश्चिती दुजें कांहीं

amhan ekavidh bhavikanchi jati | na jane nishchiti dujen kanhin

रचनाकार: संत सेना · अभंग
आम्हां एकविध भाविकांची जाती । न जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥१॥ खूण जाणे चित्तीं ्षोभ उपजेना । कळवळुनि स्तना लाव पाळी ॥२॥ अवघे होऊ येतें तुज वाटे चित्तें । उपासने परतें नावडे कांहीं ॥३॥ डोळा मुख पाहूं मुखीं नाम गाऊं। सेना म्हणे पाहूं जळींस्थळीं ॥४॥