भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि सोनियाचा दिवस। दृष्टी देखिलें संतांस

aji soniyacha divas| drushti dekhilen santans

रचनाकार: संत सेना · अभंग
आजि सोनियाचा दिवस। दृष्टी देखिलें संतांस ॥१॥ जीवा सुख झालें। माझें माहेर भेटलें ॥२॥ अवघा निरसला शीण। देखता संतचरण ॥३॥ आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ॥४॥