भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास

amhi vishnuche das | na manun anik devas

रचनाकार: संत सेना · अभंग
आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास ॥१॥ स्तुति आणिकांची करिता । ब्रह्महत्या पडे माथा ॥२॥ तुजविण देव म्हणतां। अवघी पापें पडो माथा ॥३॥ न करी पूजा आणि सेवन । सेंना म्हणे तुझी आण ॥४॥