भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिंडवितां देश । नये तुटी ज्या लाभास

hindavitan desh | naye tuti jya labhas

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हिंडवितां देश । नये तुटी ज्या लाभास ॥१॥ चाले सर्व घेणेंदेणें । कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥ पारखितां भलें । कसींतांही उतरलें ॥३॥ निळा म्हणे निवडी नाहीं । एकसारिखेंचि अवघेंही ॥४॥