भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीविण आहे कोण । सान मोठें वेगळें

harivin ahe kon | san mothen vegalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीविण आहे कोण । सान मोठें वेगळें ॥१॥ सर्वांचाही सर्व साक्षी । अध्यक्षी हें नाम त्या ॥२॥ कर्मा ऐसें देतां फळ । सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥ निळा म्हणे वीटे उभा । परि हा नभा व्यापक ॥४॥