भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी

hishobi hishob avaghachi milala | surya uday jhala antaradrushti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥ देऊनियां गांठ लाविलें कपाट । साधिलें अचाट गुरुसेवा ॥२॥ ठेऊनियां हात स्वयें ब्रम्ह केले । नाहीं तें उरलें मी तूं पण ॥३॥ निळा म्हणे ऐसा गुरुकृपेचा कोंवळा । डोळियांचा डोळा दाखविला ॥४॥