भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा गे पहा विटे उभा । सच्चिदानदांचा हा गाभा

ha ge paha vite ubha | sachchidanadancha ha gabha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हा गे पहा विटे उभा । सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥ देखे सकळांचेही भाव । अध्यक्ष हें याचें नांव ॥२॥ जेथें तेथें जैसा तैसा । नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥३॥ निळा म्हणे माझया जिवीं । ठेला जडोनी तो गोसावी ॥४॥