देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता
detan ghetan yetan jatan | sada tujhi sannidhata
देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता ॥१॥ नाहीचि कल्पांतीं वियोग । ऐसे व्यापियेले अंग ॥२॥
detan ghetan yetan jatan | sada tujhi sannidhata
देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता ॥१॥ नाहीचि कल्पांतीं वियोग । ऐसे व्यापियेले अंग ॥२॥
detan shivya hanso lage | ninda shlaghye aikoni
देतां शिव्या हांसो लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥१॥ करिती त्यांचे असघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥२॥
dev angen nirabhas | bhakta rupas changala
देव अंगें निराभास । भक्त रुपस चांगला ॥१॥ म्हणोनियां तें आणिती रुपा । दर्पणीं पहा पां जेवीं नभ ॥२॥
dev adaren mhane bhaktan | ghya ho bhukti mukti atan
देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥ भक्त म्हणती नेघों देवा । पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥
dev ghara ala | bhaktin sanmanen pujila
देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥ पाहुणेर पंगती । संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥
dev chalila sangaten | bhakta jati jya jya panthe
देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥ परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥
dev tochi bhakta nahin vegalik | jal gar udak jayapari
देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥ येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥
dev nasatan bhaktanchin vighnen | kon janmamaranen nivariten
देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥१॥ कोणासी म्हणते धांवा धांवा । करितां कुडावा कोण दुजा ॥२॥
dev pragatachi lapala | ad apan baisala
देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥ काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥
dev mhane bhaktaraja | avher majha na karava
देव म्हणे भक्तराजा । अव्हेर माझा न करावा ॥१॥ भोजनकाळीं पाचारावें । मजही घ्यावें सांगातें ॥२॥
dev mhane bhaktaho kanhi tari ghyare | te mhanati ure shinachi ghetan
देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥ याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥
dev hansoni bolati | nako yeun kakulati
देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती ॥१॥ आम्ही रंजवु आपणीयां । तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥
devachi jhale ange | deva bhajatan anuragen
देवचि झाले अंगे । देवा भजतां अनुरागें ॥१॥ शुक प्रल्हाद नारद । अंबरिष रुकमांगद ॥२॥
devapan tumhi gamavilen deva | naikoni dhanva yenen kalen
देवपण तुम्ही गमाविलें देवा । नाईकोनी धांवा येणें काळें ॥१॥ न करा धांवणे केल्या कंठस्फोट । क्रीया ऐशी नष्ट धरियेली ॥२॥
devan bhaktan bhinnapan | dekhati jan murkha te
देवां भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥१॥ सविता तोचि नारायण । वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥
deva bhaktancha sohala | vachen gati velovelan
देवा भक्तांचा सोहळा । वाचें गाती वेळोवेळां ॥१॥ म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनीश्वर ॥२॥
devachen varma sampadala bhav | navajaye javaluni adakala dev
देवाचें वर्म सांपडला भाव । नवजाये जवळुनी आडकला देव ॥१॥ देव म्हणे माझी नव्हेचि सुटका । भावेंविण म्हणती देवोचि लाटिका ॥२॥
devadhidev mugutamani | kari tehani dasagharin
देवाधिदेव मुगुटमणी । करी टेहणी दासाघरीं ॥१॥ शीण त्या होऊं नेदी भाग । वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
devabhetin santapan vire | devapan nure santabhetin
देवाभेटीं संतपण विरे । देवपण नुरे संतभेटीं ॥१॥ ब्रम्हानंदे निमग्न झाले । आप विसरले आपणां ॥२॥
devamajin bhakta ase | bhakta angin dev dise
देवामाजीं भक्त असे । भक्ता अंगीं देव दिसे ॥१॥ ऐशी परस्पंरे मिळणी । जेवीं प्रभा आणि तरणी ॥२॥