भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां

dev mhane bhaktaho kanhi tari ghyare | te mhanati ure shinachi ghetan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥ याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥ रिध्दिसिध्दी देईन तुम्हां । ते म्हणती आम्हां विटाळ तो ॥३॥ विचारी देव करावें कैसें । कैवल्याही ऐसें नेघों म्हणती ॥४॥ आतां आवडेल तरी तें मागा । देईन सांगा जीवींचें तें ॥५॥ निळा म्हणे ह्रदयीं ध्यान । दयाहो जीवन नाम तुमचें ॥६॥