भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचें वर्म सांपडला भाव । नवजाये जवळुनी आडकला देव

devachen varma sampadala bhav | navajaye javaluni adakala dev

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवाचें वर्म सांपडला भाव । नवजाये जवळुनी आडकला देव ॥१॥ देव म्हणे माझी नव्हेचि सुटका । भावेंविण म्हणती देवोचि लाटिका ॥२॥ वर्म हें यासीं दाविलें कोणें । संतांसी ठाउकें येर कोणीही नेणे ॥३॥ निळा म्हणे भक्तासी तिहींचि दाविलें । न सोडिती आतां जिवेंसी बांधलें ॥४॥