भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें

dev nasatan bhaktanchin vighnen | kon janmamaranen nivariten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥१॥ कोणासी म्हणते धांवा धांवा । करितां कुडावा कोण दुजा ॥२॥ कोण नेता वैकुंठासी । आपुले विश्रांतीसी निज घरा ॥३॥ निळा म्हणे देवावीण । संसारबंधन न तुटतें ॥४॥