भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला

dev pragatachi lapala | ad apan baisala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥ काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥ निज ज्वाळें वैश्वानर । लह्या लोपिला सागर ॥३॥ निळा म्हणे धुळी । आड ठेली महीतळीं ॥३॥