तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों
tumhi sant dayaghan | amhan mhanaun vinaviton
तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥१॥ सलगी केंली पायांपाशीं । करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥
tumhi sant dayaghan | amhan mhanaun vinaviton
तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥१॥ सलगी केंली पायांपाशीं । करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥
tunchi pandharinath | sanchar tatvatan hadayant
तूंचि पंढरीनाथ । संचर तत्वतां हदयांत ॥१॥ ऐसा प्रताप आणिका आंगीं । नाहीं ये युगीं विवरितां ॥२॥
te mhanati re he surapatichi | puja aji devadevachi | uchchhishta karun naye he kulinchi | ali padhdati chalat
ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत ॥१॥ ऐंसे एकोनियां गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ । कावडी हिरोनियां सकळ । आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥
techi dhanya techi dhanya da sukruti jan naradehi
तेचि धन्य तेचि धन्य द सुकृती जन नरदेही ॥१॥ जिहीं करुनि नामपाठ । भरला घोट व्दैताचा ॥२॥
techi bhakta bhagavat | santaseve je nirat
तेचि भक्त भागवत । संतसेवे जे निरत ॥१॥ शुध्द त्यांचा भक्तिभावो । संत वरदें लाभे देवो ॥२॥
techi majhe sarvasakshi | aheti kaimpakshi mhanoni
तेचि माझे सर्वसाक्षी । आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥ काय केलें इतरां जनां । भरली भावना त्रिविधा ॥२॥
techi sant techi sant | jyancha het vithathalin
तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठठलीं ॥१॥ नेणती कांही टाणेटोणे । नामस्मरणें वांचुनी ॥२॥
tenen dananinle gokul utarandihi khachalya sakal || dhanvinnale gauli ani goval | mhanati ha ravakallol kashacha
तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥ तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी । आश्रचर्य करिती आपुलाले मनीं । म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥
tethen majhe kayase bol | sant sakhol sanvad
तेथें माझे कायसे बोल । संत सखोल संवाद ॥१॥ आइकतांचि समाधान । होतेसें उन्मत मनाचें ॥२॥
tethenchi baisalen | man nuthi kanhi kelen
तेथेंचि बैसलें । मन नुठी कांही केलें ॥१॥ विटेवरी विराजती । चरण तेचिं आठवती ॥२॥
taishinch vatsen jichi jesin | hotin houni thela taisin | bandin khairin mori jambulasin | tambadi dhavali kapilavanen
तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥ बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥
taise tumachya yogen thor | amhi pamar jivajantu
तैसे तुमच्या योगें थोर । आम्ही पामर जीवजंतु ॥१॥ गाऊं वानूं तुमच्या गुणा । तेणें भूषणा वाढलों ॥२॥
tochi janen antarichen | latiken sachen sarvadrushta
तोचि जाणें अंतरीचें । लटिकें साचें सर्वदृष्टा ॥१॥ कैसें चाले तयापुढें । निवडे कुडे वरावरी ॥२॥
tochi bramhavid jan | parabrahamin vrutti lin
तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन ॥१॥ व्दैताव्दैत मावळलें । पूर्णब्रम्ह अनुभविलें ॥२॥
tochi vaniti anand | paramanand antarincha
तोचि वणिती आनंद । परमानंद अंतरींचा ॥१॥ जनीं लावावया गोडी । कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥
tyachipari ha murari | pasarala na disechi aisa duri | chalatu udagachiya pari | to asuri lakshit
त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥ येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥
tyachimajin hotin jati | jiv tya nenati atmaya
त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥ नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥
tyache payin majhi budhdi | jadali kadhin na dhalechi
त्याचे पायीं माझी बुध्दी । जडली कधीं न ढळेची ॥१॥ ज्याचे ध्यानीं मनीं हरी । नामें वैखरी उच्चार ॥२॥
tras upaje majhiya mana | avalokitan tyanchya vadana
त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥ जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥
tribhuvanapati aho deva | dinabandhava vithoji
त्रिभुवनपति अहो देवा । दीनबांधवा विठोजी ॥१॥ भावा माझया दया जी थार । आपुल्या निरंतर चरणापें ॥२॥