भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव अंगें निराभास । भक्त रुपस चांगला

dev angen nirabhas | bhakta rupas changala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव अंगें निराभास । भक्त रुपस चांगला ॥१॥ म्हणोनियां तें आणिती रुपा । दर्पणीं पहा पां जेवीं नभ ॥२॥ नामें रुपें मंडित केला । शृंगारिला अळंकारें ॥३॥ निळा म्हणे भक्त जनक । देव बाळक या हेतु ॥४॥