भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया

tyachimajin hotin jati | jiv tya nenati atmaya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥ नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥ जेथें तेथें उभीचि आड । होऊनियां कवाड भ्रांतीचें ॥३॥ निळा ब्रम्हादिकां । याचिपरी लोकां झकविलें ॥४॥