भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेचि भक्त भागवत । संतसेवे जे निरत

techi bhakta bhagavat | santaseve je nirat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तेचि भक्त भागवत । संतसेवे जे निरत ॥१॥ शुध्द त्यांचा भक्तिभावो । संत वरदें लाभे देवो ॥२॥ संतवचनी विश्वासती । सत्य परमार्थ त्यांचे हातीं ॥३॥ निळा म्हणे संतसेवा । घडे त्या उदयो झाला दैवा ॥४॥