भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथें माझे कायसे बोल । संत सखोल संवाद

tethen majhe kayase bol | sant sakhol sanvad

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तेथें माझे कायसे बोल । संत सखोल संवाद ॥१॥ आइकतांचि समाधान । होतेसें उन्मत मनाचें ॥२॥ सिध्द प्रदासाची वाणी । जे तुमच्या गुणीं मिरवली ॥३॥ निळा म्हणे ती तों रंक । जाणती लोक सकळीही ॥४॥