भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथेंचि बैसलें । मन नुठी कांही केलें

tethenchi baisalen | man nuthi kanhi kelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तेथेंचि बैसलें । मन नुठी कांही केलें ॥१॥ विटेवरी विराजती । चरण तेचिं आठवती ॥२॥ कटीं कर तुळसीमाळा । ध्यानीं बैसला तो डोळां ॥३॥ निळा म्हणे भूकतहान । गेली विसरोनियां मन ॥४॥