भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥ दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल । बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धरींरे मना तूं विश्वास या नामीं । अखंड रामनामीं ओळखी धरीं ॥१॥ जप करीं अखंद खंडेना । निशिदिनीं मना होय जागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥ आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥ विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥ विठोबाचे नामीं रंगलें हें मन । मिळालें जीवन सिंधुमाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥ अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥ तया सुखा दृष्टि लागेल वो झणीं । मग मी साजणी काय करूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांवोनियां नंदें धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥ सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धिग्‍ तो ग्राम धिग्‍ तो आश्रम । संत समागम नाहीं जेथें ॥१॥ धिग्‍ ते संपत्ति धिग्‍ ते संतति । भजन सर्वांभूतीं नाहीं जेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥ लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन ॥१॥ सोपान वटेश्वरें केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥ प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण ॥१॥ भुजंगाचीं पिलीं उपजतांचि वेगळीं । त्यांसी डेखूं शिकविलें हो कोणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें ॥१॥ दामासेठी पाहुनी नामयासी बोले । वेर्थ म्यां छळिलें तुज बाळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥ सांवळीसी आंगीं उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटीं ।

रचनाकार: संत नामदेव