भजनी मालिका
← भजनांकडे परत

धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें

dhir dharin satya hen to narayana | shuddha acharanan na sandaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥ लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥ दंभ अभिमान सर्व त्यजोनियां । शरण त्या स-खीया जावें आतां ॥३॥ निंदा करिती तो मानावा आदर । स्तुति तें उत्तर नायकावें ॥४॥ न धरावी चाड मानासन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ॥५॥ नामा ह्मणे हेंचि रूढवावें मानसीं । क्षण एक नामासी विसंबूं नये ॥६॥