भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों

dharin nandato baravepari | mhanuni kelise anturi | nitya bhandan taya varin | anik kanhin na dekhon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥ दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल । बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥ धाकटीकडे पाहतां कोडें । वडील धडधडा रडे । मेल्या तुझें गेलें मढें । तिकडे कांरे पहातोसी ॥३॥ वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल केली सुण्या । लाज नाहीं तुझ्या जिण्या । काळतोंड्या बैसलासी ॥४॥ वडील बाईल धरी दाढी । धा-कटी ओढून धरी शेंडी । सांपडलासी यमझाडी । लाशीपरी पड-लाशी ॥५॥ सवती सबतीचा करकरा । उभा शिणलों दातारा । भेटी करी बनींच्या व्याघ्रा । परी संसारा उबगलों ॥६॥ सवती सबतीचा कैशी धरणी। कौतुक पहाती शेजारिणी । तया पुरुषाची विटंबनी । थोर जाचणी तयाशी ॥७॥ नामा ह्मणे गा श्रीहरी । दोघी बायका ज्याचे घरीं । त्याचे नसावें शेजारीं । थोर दु:ख तयाशी ॥८॥