भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ

dharoni hastak baisasi ekantin | bhaktasi shripati sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥ सर्व आचरण दाविसी प्रकार । कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥ नामा म्हणे होसी चतुर आपण । आमुचें निर्वान पाहूं नको ॥४॥