भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर

dharila pandharicha chor | galan bandhoniyan dor

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥ ह्रदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥ शब्दें केली जडजुढी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥