भजनी मालिका
← भजनांकडे परत

धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें

dhondoba namadeven kadhila baheri | antarbahyaktarin sonen jalen jalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें ॥१॥ दामासेठी पाहुनी नामयासी बोले । वेर्थ म्यां छळिलें तुज बाळा ॥२॥ राजाई गोणाई धांवोनियां आली । विनीत होऊनि बोली बोलताती ॥३॥ आम्ही हे कुटुंबी द्र्व्या नाहीं घरीं । म्हणोनि श्रीहरी पावलासी ॥४॥ गोणाई दामासेठी सांगे नामदेवा । न बोलावें भावा जनीं बापा ॥५॥ जगा मात कळलियावरी । नेतील हिरोनि धोंडोबासी ॥६॥ नामदेव म्हणे आपुलें द्र्व्य घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥७॥