भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु

dhyan sanvalen gokulinchen | dhanv pav vegin hari sanvaliya ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥ सांवळीसी आंगीं उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटीं । सांवळीसी कांसे कासियला कटीं । गोवळिया ॥१॥ सांवळीसी तनु वरवी । सांवळें वृंदावन मिरवी । सांवळ्याशा तुळसी कानीं । मंजुरिया कोंवळिया ॥२॥ संवळीसी कंठीं माळा । सांवळें ह्रदयीं पदक विशाळा । सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या । गोंवळिया ॥३॥ सांवाळिसी हातीं काठी । सांवळासा कांबळा पाठीं । नामयाचा स्वामी गायी राखी । धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥