भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥ मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देह मंदिराभीतरीं । शेजे सूदला श्रीहरी । निद्रा उन्मनीचे भरी । तें म्यां स्वप्न देखिलें ॥१॥ स्वप्नीं भुललें बाई । मागील नाठवेचि कांहीं । हा जीव परवस्तूच्या ठायीं । तनुमने आटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥ स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥ धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥ तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥ देखिलागे माय यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधि-केच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥ करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥ पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥ अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥ मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा । अपराध क्षमा करा माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥ रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव