भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवोनियां नंदें धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला

dhanvoniyan nanden dharile charan | ghaluni asan bais-vila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धांवोनियां नंदें धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥ सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥ रोहिणीचा पुत्र सखी आहे राम । स्मर्रे पुरुषोत्तम कधीं आह्मां ॥३॥ गोकुळांत गौळी आहे एक नंद । आठवी गोविंद कधीं तरी ॥४॥ काय माझें पुण्य उद्धवा सरलें । ह्मणोनि टाकिलें कृष्ण-नाथें ॥५॥ परब्रह्म पूर्ण धाडी मी वनासी । ह्मणोनी ह्लषिकेशी को-पलासे ॥६॥ मेघ:श्याम मूर्ति सकुमार पाउलें । न देखती डोळे आतां माझे ॥७॥ ऊठ नंदा जेऊं कोण ह्मणे आतां । दु:ख माझ्या चित्ता फार वाटे ॥८॥ नेत्रीं अश्रुधारा कंठ सद्नदीत । पडीला मूर्च्छित नामा ह्मणे ॥९॥