भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥ गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥ सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥ वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी । दावावया जगीं योग करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं ॥१॥ गाऊं नाचूं आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही नको देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु । योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु०॥ चिदानंदधनु तनु सांवळावो हरि पाहातां निवती लोचन । तनु मन चरणीं वो गुंतलीं नाम गोपा-ळाचें अमृत समान ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥ वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया ॥१॥ पडली कुर्‍हाड कपाळी । रागें सूप चाटू आफळीं । जळत काष्टातें हातीं कवळी । जैसी आसाळी गर्जतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी ॥१॥ काय हे नगरी पांचही तराळ । निद्नेनें भ्रमले व्याकुळ झाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥ हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥ वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे ॥१॥ कंसानें मांडिला अधर्म बहुत । मारावें त्वरित तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥ वृद्ध ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोकुळीं गोपिका गोपाळ सकळ । मध्यें घननीळ क्रीडा करी ॥१॥ करी खेळ मोठा स्थापिलें निशाण । स्वयें नारा-यण हाका मारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥ तैसे देवा तुझें नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ॥१॥ लाजिरवाणें तुवां केलें रे हें जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तैहुनि मी करीं आस तुझी ॥१॥ उपजलासि तैं मज जाला संतोष । आनंद उल्हास वाटे जीवां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक । पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ॥१॥ महिमेचा संसार सांडोनि आपुला । संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ ॥१॥ निवृत्ति मुक्ताबाई संगें पंढरिनाथ । आले मंडपांत समुदायेंसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव