भजनी मालिका
← भजनांकडे परत

गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया

gruhastha baisala osarivari | gruhasvabhini svayampak kari | tanv margastha brahman ala dvarin | anna dyaven svamiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया ॥१॥ पडली कुर्‍हाड कपाळी । रागें सूप चाटू आफळीं । जळत काष्टातें हातीं कवळी । जैसी आसाळी गर्जतसे ॥२॥ ब्राह्मणें घेतलें धरणें । तंव बाईलेसी गेला शरण । म्हणे माझ्या ग्रासांतून ग्रास देणें । लज्जा राखणें आजिची ॥३॥ मग ह्मणे वो बाईल । कैंचा आलासे बईल । तुजसारिखा असेल । वैलसि बैल सोइरे ॥४॥ गृहस्थें धरोनि वेणी । तिनें शेंडीत हात घालोनि । अंगजूठ होऊनि । बाईल हु-मण्या मारितसे ॥५॥ त्याचे मागें सुटली शेंडी । सवेंचि धरि-लासे अंडीं । पहिली असे मुर्कुंडी । तोंडिच्या तोडीं मारी-तसे ॥६॥ शेजारीं व्याही होता तो धांवला । येतांचि तोंडावरी मारिला । चौकीचा दांत पाडिला । केला बोचिरा व्याही तो ॥७॥ आधींच व्याही होते रोडके । आणि हाणी तल्प-ठाण वईच्या बुडखे । निथळत निथळत बोडकें । घेऊनि सुडकें पुसितसे ॥८॥ तिकडूनि धांवला मेहुणा । तोहि पाडिला उताणा । केला तिनें घोळाणा । तया मेहुण्याचा ॥९॥ ब्राह्मणाकडे दांत रगडी । तंव ब्राह्मण हळु हळु पाय काढी । ओल्या धोतराची घडी । पळतां वेंगडी वळतसे ॥१०॥ ऐसा ओलंडिला दारवंटा । तंव धाविन्नली पाठोवाटा । सीण घालून हाणिल्या बरोटा । कोठें थोटया पळसील ॥११॥ ऐसा कलियुगीं स्त्रियांचा विचार । एक बुडविती बेताळीसनर एक दाविती स्वर्गीचें द्वार । नामा निरंतर विनवीतसे ॥१२॥