भजनी मालिका
← भजनांकडे परत

गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण

gita hechi ganga guhyabhav pain ga | nam hechi vega sodavan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥ सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥ उपदेश अर्जुना जनीं जनार्दना । अखंड भावना भूतदया ॥३॥ नामा म्हणे सर्व आहे हाचि देव । उदार माधव सर्वांभूतीं ॥४॥