भजनी मालिका
← भजनांकडे परत

गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय

gita gita mhanatan pap hoy nash | kaivalyahi tyas prapta hoy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥ गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥ येका येका श्लोकीं कोटी अश्वमेध । पुण्यही अगाध म्हणताम गीता ॥३॥ नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता । तयाच्या सुकृता पार नाहीं ॥४॥