भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं

gun dosh tyache hmanatan shladhije | nirvasan kije chitta adhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं ॥१॥ गाऊं नाचूं आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही नको देवा ॥२॥ मनाची पैं वृत्ति बुडे प्रेमडोहीं । नाठवती देहीं दुजा भाव ॥३॥ सगुणीं निर्गुणीम एकचि आवडी । चित्तीं दिली बुडी चिदानंदीं ॥४॥ नामा म्हणे देवा मागणें ऐसी सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥५॥