भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती

gokulin anartha hotati bahut | miloni samasta vichariti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥ वृद्ध ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥२॥ समस्तां मानला तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हां ॥३॥ अहिर्निशीं देवा करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पैं ॥४॥