भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें

gonai mhane namya jalpasi bhalaten | tuj konya daivaten vodhiyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ॥१॥ लाजिरवाणें तुवां केलें रे हें जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं ॥२॥ सांडीं सांडी नाम्या तूं हें देवपिसें । बळें घरा कैसें बुडवितोसी ॥३॥ नवमास उदराभीतरीं वाहिला । माझ्या नेणत्या बाळा चाळविलें ॥४॥ तुझे द्वारीं वैसोनि उपवास करिन । नामा घेऊन जाईन गुणराशी ॥५॥ तेथें ते होईल लटिकेंचि भांडण । नामा द्यावा म्हणे गोणाई माझा ॥६॥ गोणाई म्हणे नाम्या कळेल तें करी । स्वहित विचारी सांगो किती ॥७॥