भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे ॥१॥ लक्षचौर्‍यांशींच्या करितां येरझारा । शिणलसि गव्हारा वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी ॥१॥ माझें मी ह्मणतो गेले नेणों किती । र्मक चक्रवर्ति असं-ख्यात ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षीरसागरांत अससी बैसला । धांवोनी मजला भेटी देईं ॥१॥ कैलासासी शीव पूजितसे तुजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥ धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानीं । ते आले धांवोनि मागावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं ॥१॥ रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खवळलें आतां न भियेंरे तुज । सांडियेली लाज लौकिकाची ॥१॥ आम्हीं दीन सिंपे यातीचे हो हीन । दे माझें ठेवणें केशाराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥ आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खाटिकाप्रमाणें करिसी व्यापार । मनीं निरंतर धरो नियां ॥१॥ दुष्ट दुचाचारी दुर्बळ घातकी । परम नाशकी पापिष्ट तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें ॥१॥ यमुने पाबळीं गोपां पाचारीत । सिदोर्‍या शोभत पाठीवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेचरापासी जाय पुससी सागसी तें आहे । येरा आणिका काय उमगेना ॥१॥ जाय जाय वेगीं लवलाहे पाहें । खेचराचे पाय सोडूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा ॥१॥ नामा तेथें आला देव नमस्कारिला । देखोन बोलला वचन त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥ नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेळ मांडियला गोल्हात शिखरीं । अर्थ चंद्रावरी शेखी याचा ॥१॥ चोवीस त्या गुंफा रुद्रलिंगीं नांदे । अभेद तो वेद बोले तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें । तंव आळकापुरीं कीर्तनें । टाळ मृदांग झणत्कारले ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥ अजामेळाचें तुवां चुकविलें संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥ तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव