भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

कापड घेऊनी जाय बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥ लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती केली नाम्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥ कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं । तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥ काय केशिराजा वाणूंज मी दुबळें । शरणागता लळे पुरविशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय आम्हापाशीं आहे धन वित्त । दान तें उचित देऊं काय ॥१॥ देतां घेतां आम्हां पुरे पुरे जालें । संगतीं त्यागिलें भिवोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥ उबगति सोयरीं धायरीं समस्त । कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय कामा पुत्र कोणा आले जाणा । शेखीं त्या रावणा काय झालें ॥१॥ महादुष्टें शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥ अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय गुणदोष आणितोसी मनाअ । नको नारायणा अभक्तची ॥१॥ शरीरसंबंधा सुचती अंतरें । काय म्यां पामरें आवरावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें ॥१॥ भीतरी पालट जंव नाहीं झाला । तोंवरी न बोल जाणपणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली ॥१॥ अनंता जन्मांचे होंचि प्रायश्चित । वाचे जपे नित्य राम नाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव