भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापड घेऊनी जाय बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवितसे

kapad gheuni jay bajarasi | gonai namyasi shikavitase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कापड घेऊनी जाय बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥ लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती केली नाम्या ॥२॥ नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा । मैंद हा खरा गळाकाटू ॥३॥ याचे संगतीनें संसार जाळावा । भोपळा हा घ्यावा भीक मागूं ॥४॥ नको संग धरूं नाम्या ऐक गोष्टी । गोणाई हनुवटी धरूनी सांगे ॥५॥