भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥ भय तें मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल ॥१॥ देव खादलें ते काय करी जाणा । सर्व अवगुण तयापासीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे ॥१॥ कवणाचें घर कवणाचें दारा । भावें नरहरि ओळंगारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

औट हात घोंगडें दिधलें हरी । पांधरलों नाहीं घणीवरी ॥१॥ माझें घोंगडें कृष्णा गा जतन करीं । नागविलें थोरीं पांचाजणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥ तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा ॥१॥ रात्रंदिवस मज ठेवुनि जवळ । घालसी कवळ मुखामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥ आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे । जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥ उठोनी कबीर संतां नमन केलें । बैसावया दिलें तृणासन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कमळगर्भा मनीं थोर चिंता करी । पद्म ठसेवरी उम-टताती ॥१॥ नीलोत्पल जैसें चरण वानूं कैसे । सकुमार राजस विठ्ठ-लाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥ जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करावें सार्थक रखुमाईनें तेव्हां । आरंभिली सेवा अश्वत्थाची ॥१॥ जाणोनी पैं देवें उग्र अनुष्ठान । तेथें जालें येणें श्रीपादाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करितसे स्नान अजाचा बाळक । वस्त्रें अमोलिक परि-धान ॥१॥ लावोनियां भाळीं कस्तुरी केशर । करी नमस्कार वसिष्ठासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी ॥१॥ एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ॥१॥ बहुत व्युत्पत्ति सांगति पुराण । व्यर्थ तें स्मरण नाम नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव