भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची

kay gun dosh majhe vicharisi | ahe mi ton rashi aparadhanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥ अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ॥२॥ स्वप्नीं देवा तुझी नाहीं घडली भक्ति । पुससी विरक्ति कोठुनियां ॥३॥ तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी । सकळ अंतर्यामीं गाऊं तुज ॥४॥ नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण । नको करूं शीण पांडुरंगा ॥५॥