भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

कंसें पाठविली मायावी पूतना । देवोनिया स्तना बाळें मारी ॥१॥ दीन दुर्बळांचीं मारीत बाळकें । करीताती शोक माय- बाप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कस्तुरी कुंकुम रेखे लाल टिळा । केशराची उटि सर्वां-मासी ॥१॥ पाहिला पाहिला माझा पांडुरंग । जीवीं जिवलग डोळे भरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिनताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां करितोसि शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥ रामकृष्ण हरी गोविंद गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां करिसी हव्यास इंद्रियांचा सोस । वायां कासावीत कोण्या काजें ॥१॥ सर्व ही लटिकें मोहबंधन । सत्य हें निधान विठठल एक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां ॥१॥ तुजविण मज न दिसे निर्वाणीं । मायबाप धणी गणगोत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा ॥१॥ त्रितापें तापलों बहुत पोळलों । चिखलीं पडिलों दीनानाथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥ करुणाकल्लोळणी अमृत संजीवनी । चिंतल्या निर्वाणीं पावें वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां ॥१॥ मागें बहुतापरी रक्षियलें आह्मां । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥ जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥ लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥ पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी । देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें ॥१॥ कण्हेरीच्या मूळा सुगंध तो नाहीं । कसाबाची गाई जिणें कैचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा ॥१॥ असे कांहीं इच्छा मागावें आणीक । दिल्हें हें बाळक ह्मणती दोघे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥ तूं तो आमुची गडी । म्हणोनि मी केली खोडी । घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥

रचनाकार: संत नामदेव