भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा

kan ga mokalilen majhiya viththala | dhanva tujha kela mayabapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा ॥१॥ त्रितापें तापलों बहुत पोळलों । चिखलीं पडिलों दीनानाथा ॥२॥ यालागीं तुजला भाकितों करुणा । धांवसी निर्वाणा पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । रुक्माईच्या कांता घाली उडी ॥४॥