भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसें पाठविली मायावी पूतना । देवोनिया स्तना बाळें मारी

kansen pathavili mayavi putana | devoniya stana balen mari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंसें पाठविली मायावी पूतना । देवोनिया स्तना बाळें मारी ॥१॥ दीन दुर्बळांचीं मारीत बाळकें । करीताती शोक माय- बाप ॥२॥ गहिंवरोनि तेव्हां पुसे परीक्षिती । भगवंताची मूर्ती बा-ळरूप ॥३॥ अभय देतसे बापा नको रडूं । तें काय घुंगर्डू मारूं शके ॥४॥ जेथें पुराण कीर्तन होत नामघोष । तेथें यम त्रास घेत असे ॥५॥ पळती तेथूनि असुरादिक वैरी । तेथें नाहीं थोरी पाप तापा ॥६॥ नामा ह्मणे आलीए नंदाचिये घरीं । स्वरूप सुंदरीं देवांगना ॥७॥