भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कौसल्या यज्ञशे सेउनी राम जन्मला तियेचें पोटीं । वनवासासी जातां वियोग पावली दुःख शोकें हिंपुटीं ॥१॥ धन्य धन्य ते अहिल्या शिळा । हरीच्या पावली चरणकमळा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

क्रोधयुक्त अंतःकरण । तेणें नासे स्वधर्माचरण ॥१॥ ऐसें द्वेषें बांधलें घर । ते ठायीं क्रोध अनिवार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥ येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥ आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥ कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें ॥१॥ पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पिंताबरीं । हृदयावरी वैजयंती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥ तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥ घडी मडकें कुंभाराचें । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥ एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥ देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ