भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौतुक वाटतें मनाचें । नामस्मरण नेणें साचें

kautuk vataten manachen | namasmaran nenen sachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कौतुक वाटतें मनाचें । नामस्मरण नेणें साचें ॥१॥ कां रे मानिशी कंटाळा । मना खळा अधम तूं ॥२॥ नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥