भजनी मालिका
← भजनांकडे परत

खांबसुत्राची बाहुली । सुत्राआधीन उगली

khambasutrachi bahuli | sutraadhin ugali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खांबसुत्राची बाहुली । सुत्राआधीन उगली ॥१॥ माझें मीपण नाहीं स्वतंत्र । क्रियाकर्म ते परतंत्र ॥२॥ बाहुलीये नाहीं स्वतंत्रता तैसा नव्हे कर्म कर्ता ॥३॥ एका एकपणाचे सूत्र । जनार्दनपायीं स्वतंत्र ॥४॥