भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥ नेणें रे कैसें वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥ हेळु लोपला तेजें जें देखतां मन निवे । दरुशनें भागलें हेवा करता गे गाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी कंदर्पांच्या श्रेणीं । कुर्वडींतक जनार्दनीं ॥१॥ बरवा जनार्दनीं जनीं । पाहतां तनुमन भुलवणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥ कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायीं रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोटी जन्म आम्हीं करूं हरिकथा । कर्मकांड माथां धरूनियां ॥१॥ ऐहिकादि कर्में करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥ शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥ धरिलें नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा ॥१॥ सोयरा तूं देव करी पां संसारीं । वायां हाव भरी होऊं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥ सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ