भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो

khel mandila vo khel mandila vo | ya sansaracha khel mandila vo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥ एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथें नाही गुंतला वो ॥३॥