भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे एके दिनीं । तुळशीं घालितां हो पाणी

kone eke dinin | tulashin ghalitan ho pani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणे एके दिनीं । तुळशीं घालितां हो पाणी ॥१॥ देव मानी त्याचा भार । तोडितसे वेरझार ॥२॥ शीण भाग काहीं । तया येऊं देत नाहीं ॥३॥ ऎसा कपाळु जनार्दन । एका वंदितसे चरण ॥४॥